पालकांसाठी

लैंगिकता समजून घेताना…

लैंगिकता शिक्षणासाठी पालक म्हणून स्वत: पुढाकार घेत आहात ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला तज्ञ असण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त बोलण्याची आणि ऐकण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मुलांशी लैंगिक, भावनिक, शरीराप्रती आणि नातेसंबंधांबद्दल मोकळेपणाने केलेले संभाषण त्यांना मोठे झाल्यावर सुरक्षित आणि निरोगी राहण्यास मदत करेल.

पालकांसाठी- लैंगिकता समजून घेताना…

लैंगिकता शिक्षणासाठी पालक म्हणून स्वत: पुढाकार घेत आहात ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला तज्ञ असण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त बोलण्याची आणि ऐकण्याची इच्छा असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मुलांशी लैंगिक, भावनिक, शरीराप्रती आणि नातेसंबंधांबद्दल मोकळेपणाने केलेले संभाषण त्यांना मोठे झाल्यावर सुरक्षित आणि निरोगी राहण्यास मदत करेल.

आपले शरीर

मानवी शरीररचना, वयात येताना शरीरात होणारे बदल, मासिकपाळी, हस्तमैथुन, त्यासंदर्भातील समज- गैरसमज

पुढे वाचा

नातेसंबंध

नातेसंबंधामधील महत्त्वाची मूल्ये, नात्यांमधील दबाव व बंधने, प्रेम, आकर्षण, मैत्री, ब्रेक अप, पॅच अप.

पुढे वाचा

लैंगिक आरोग्य

एच आय व्ही व इतर लिंगसांसर्गिक आजार (STI’s), प्रजनन मार्गाशी निगडीत आजार, लैंगिक समस्या.

पुढे वाचा

प्रजनन आणि गर्भनिरोधन

गर्भधारणा कशी होते, गर्भनिरोधनाची विविध साधने, गर्भसमाप्ती (Abortion).

पुढे वाचा

लिंगभाव व लैंगिक ओळख

पुरुष किंवा स्त्री असणे म्हणजे काय?, LGBTQAI+, समलिंगी संबंध म्हणजे काय? विविध लैंगिक अभिव्यक्ती (sexual expressions).

पुढे वाचा

लैंगिकता आणि हिंसा

शारीरिक, मानसिक व लैंगिक शोषण किंवा हिंसा, विवाहांतर्गत शारीरिक जबरदस्ती, बाल-लैंगिक शोषण.

पुढे वाचा

लैंगिकता व मानसिक आरोग्य

लैंगिक समस्यांशी निगडीत मानसिक ताण तणाव, नैराश्य, चिंता, सेल्फ हार्म.

पुढे वाचा

अपंगत्व आणि लैंगिकता

विविध अपंगत्व असलेल्या व्यक्तींचे लैंगिक आरोग्य, अभिव्यक्ती, हिंसा, सुरक्षितता व अधिकार, पालकांसाठी व शिक्षकांसाठी मार्गदर्शन.

पुढे वाचा

लैंगिकता व कायदा

लैंगिकता व त्यासंदर्भातील विविध कायदे (पोक्सो, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, इ.), लैंगिक अधिकार.

पुढे वाचा

लैंगिकता व इंटरनेट

पोर्नोग्राफी, डेटींग अ‍ॅप, सायबर स्टॉकिंग, ऑनलाइन अ‍ब्युज.

पुढे वाचा

लैंगिकता व संस्कृती

प्राचीन काळापासून लैंगिकतेबद्दलच्या कल्पना, रुपके, मिथके कशी बदलत गेली यासंदर्भातील काही पुरातन कथा व विश्लेषण.

पुढे वाचा

व्हिडिओ

अमेज व्हिडिओ

इतर साहित्य

अमिला विचारा

शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का? पण कोणाला विचारू? अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील? लैंगिकतेविषयीच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. ह्या विषयाबद्दल फारसे बोलले जात नाही. पण या विषयाबद्दलच्या मोकळ्या सवांदाने व योग्य माहितीने बरेच प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ अमिला सांगा. अमि एक बॉट असून तुम्ही अमिला लैंगिक आरोग्य, मैत्री, प्रेम, नातेसंबंध आणि अशा बर्‍याच विषयांबद्दल प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जे वाटतंय् ते मोकळेपणाने अमिला विचारा. अमि त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. लैंगिकतेविषयी फारसे बोलले जात नसल्यामुळे त्यासंदर्भातील प्रश्न विचारताना वापरले जाणारे शब्द हे बहुतेक वेळा बोली भाषेतील किंवा शिव्यांमध्ये वापरले गेलेले असतात. पण अमिला ते शब्द कळणार नाहित व त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे आम्ही इथे एक लिंक देत आहोत ज्यात बोलीभाषेतील शब्दांना काही पर्यायी शब्द दिलेले आहेत जे तुम्ही अमिला तुमचा प्रश्न विचारताना वापरु शकता. जेणेकरुन अमिला तुमचा प्रश्न कळेल व त्याचे नेमके उत्तर देता येइल.

महत्वाचे प्रश्न

मुली आणि मुलांना मासिक पाळीबद्दल अचूक माहिती देणे आवश्यक आहे. जर तुमच्या मुलांनी मासिक पाळीबद्दल प्रश्न विचारले नाहीत, तर ते 6 किंवा 7 वर्षांचे होईपर्यंत,तुम्ही स्वत: त्यांना सांगू शकता. या वयात बहुतेक मुले मासिक पाळीविषयी मूलभूत गोष्टी समजू शकतात. याबद्दल बोलण्यासाठी नेमके क्षण शोधा, मुले जेव्हा तुम्हाला त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्याशी बोला.  बोलण्याआधी तुम्ही प्राथमिक स्वरुपाची माहिती शोधून ठेऊ शकता, कोणत्याही प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे द्या,  खोटी उत्तरे देणे टाळा.

पहिली पायरी म्हणजे मुलावर विश्वास ठेवा. मग तुम्ही तुमच्या मुलाला सुरक्षित कसे ठेवायचे याचा विचार करायला हवा. मदतीसाठी तुम्ही योग्य संस्था, संघटनेसोबत संपर्क साधू शकता.  तुम्ही चाईल्डलाईन 1098 या नंबर वर फोन करुन मदत मागू शकता.

लैंगिक कल हा नैसर्गिक असतो. काही वेळा तो काळासोबत बदलू शकतो. पण तो जाणीवपूर्वक काही व्यत्यय आणून किंवा ‘उपचार’ करून बदलता येत नाही. उलट असे केल्याने संबंधित व्यक्तीच्या शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. भिन्नलिंगी कल सोडता इतर कोणत्याही आकर्षणा बद्दल चुकीच्या सामाजिक धारणा व दबाव असल्यामुळे ते मान्य करणे अवघड जाते व ते बदलण्याचा प्रयत्न केला जातो. हे चुकीचे आहे.

पाळी लवकर येण्यासाठी किंवा उशीरा येण्यासाठी घरगुती उपाय करू नये. पाळी चक्रामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मेंदू आणि अंडकोषामधल्या संप्रेरकांवर आणि शरीरात घडणाऱ्या इतर प्रक्रियांवर अवलंबून असतात. अंडकोषातून बीज बाहेर आल्यावर साधारणपणे 12-16 दिवसांनी पाळी सुरु होते. या घटना आपल्या हातात नाहीत. त्यामुळे त्यावर घरच्या घरी काही उपायही करता येत नाहीत. पण पाळी ही कटकट किंवा विटाळ नाही, तर इतर शारीरिक प्रक्रियांसारखीच एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे. पाळी लवकर व उशिरा येण्यासाठी काही औषधे घेतली जातात. ह्या औषधात कृत्रिम संप्रेरकेच असतात. अशी औषधे वारंवार घेतली तर त्यामुळे पाळी अनियमित होऊ शकते.

लोक याबद्दल देखील विचारतात

काही वेळा एखादा प्रश्न/शंका नेमक्या शब्दांमध्ये मांडता येत नाही किंवा इतरांनी विचारलेले प्रश्न आपल्याला कधी पडलेले नसतात व त्यांची उत्तरेही आपल्याला माहित नसतात. काही वेळेस प्रश्न पडलेले असतात पण विचारायला संकोच वाटतो. काही मित्र-मैत्रिणिंनी आम्हाला विचारलेले प्रश्न व आम्ही दिलेली उत्तरे तुम्हाला इथे वाचता येतील.

खूपच छान आणि महत्वाचा प्रश्न विचारला आहे. आपल्या देशामध्ये लैंगिक शिक्षण हा विषय अजूनही उपेक्षितच आहे. लैंगिक शिक्षणाचे वाईट परिणाम मुलांवर होतात अशी मानसिकता आजही आपल्या समाजात दिसते. अभ्यास, खेळ, छंद, शाळेत लक्ष लागणं, विविध कौशल्ये या सगळ्या गोष्टींकडे पालक लक्ष देतात. पण लैंगिक शिक्षणाचा विषय दुर्लक्षितच राहतो. त्यामुळे तुम्ही याविषयी जाणून घेण्याची इच्छा दाखवलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की, लैंगिकता शिक्षण हा विषय शारीरिक मिलन (समागम) आणि बाळाचा जन्म एवढ्यापुरताच मर्यादित नाही. लैंगिक शिक्षणामध्ये लिंगभावाची (स्त्रीत्वाची, पुरुषत्वाची) ओळख, कुटुंबात आणि समाजात त्यांनी निभावायच्या भूमिका. सेक्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन, देहप्रतीमा/ स्व-प्रतिमा, कामप्रेरणेची अभिव्यक्ती, माया, प्रेम, जवळीक नाती, तसचं शृंगार आणि त्यातलं आनंद सुख, या सर्वांचा समावेश होतो. आता एवढ्या मोठ्या, अतिव्याप्त विषयाबद्दल काही बोलायचं, काही सांगायचं तर सुरुवात कधी आणि कुठून करायची हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे.

मुलामुलींशी अगदी लहानपणापासूनच या विषयावर बोलणे गरजेचे आहे. बाळाला आपण एकदम धावायला शिकवत नाही. बाळ आधी पालथे होते, मग रांगायला लागते, नंतर बोट धरून किंवा कशाचातरी आधार घेऊन चालायला लागते, नंतर ते एकटे स्वतंत्रपणे चालायला लागते आणि सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे ते धावायला लागते. अशाच प्रकारे, अगदी टप्प्याटप्प्याने बाळाला, आपल्या मुलामुलीला वाढविताना लैंगिकतेच्या विषयी बोलणे गरजेचे आहे. या विषयी बोलताना एका घोटात, एकदम सगळं बोलायचं नाही तर अगदी टप्प्याटप्प्याने बोलायचं. या नाजूक विषयासंबंधी बोलताना बाळाच्या विकासाचा टप्पा लक्षात घेऊन, अगदी सौम्यपणानं, हळुवारपणे, कौशल्यानं, मुलांना समजेल अशा भाषेत बोलणे गरजेचे आहे. मुलांना त्यांच्या विकासाच्या टप्प्यांनुसार माहिती द्यायची तर त्यांच्या विकासाचे सर्वसाधारण टप्पे, वयानुसार त्यांच्या शरीरात होणारे बदल, त्यांचे वर्तन त्यांना पडणारे प्रश्न, याची नोंद घ्यायला हवी. प्रत्येक मुलासाठी हे विकासाचे टप्पे थोड्याफार फरकाने वेगळे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक मुलाचा मुलींचा वेगळा विचार करावा लागतो. ठरविक वयात नेमक्या कोणत्या विषयाबद्दल बोलायचे आणि कसे बोलायचे याविषयी सविस्तर माहितीसाठी तुम्हाला डॉ. शांता आणि डॉ. अनंत साठे यांचे “ काय सांगू? कसं सांगू?- खास आईबाबांसाठी” तसेच तथापि ने प्रकाशित केलेला “शरीर साक्षरता मुलांसाठी” हा संच उपयोगी ठरेल.

गरोदर राहण्यासाठी मुलीची मासिक पाळी चालू झालेली असणं गरजेचं असतं. जर पाळी सुरू झाली असेल, एखाद्या पुरुषाबरोबर लैंगिक संबंध आले असतील, वीर्याचा योनीमार्गाशी संपर्क आला असेल तर १२ व्या वर्षीदेखील गर्भधारणा होऊ शकते. अशा अनेक मुली आहेत ज्यांना असं गरोदरपण सहन करावं लागत आहे आणि याचे त्यांच्या आरोग्यावर आणि संपूर्ण आयुष्यावरच अतिशय गंभीर परिणाम होतात.

मुळात १२ व्या वर्षी लैंगिक संबंध येणं हा कायद्याने गुन्हा आहे. संमती देण्याचं किंवा लैंगिक संबंध म्हणजे काय, संमती म्हणजे काय हे कळण्याचं हे वय नाही. त्यामुळे इतक्या लहान वयाच्या मुलीबरोबर जर कुणी जबरदस्तीने किंवा फसवून, लबाडीने लैंगिक संबंध ठेवत असेल तर त्यांच्यावर बलात्काराचा आणि बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

मूल होऊ नये यासाठी स्त्री आणि पुरुषांनी वापरण्याची अनेक गर्भनिरोधक साधने उपलब्ध आहेत. त्याचा योग्य वापर केल्याने गर्भधारणा टाळता येऊ शकते. पुरुषांसाठीचा निरोध हे सर्वात सुरक्षित व सोपे गर्भनिरोधक आहे. निरोध वापरल्याने पुरुषाच्या आणि स्त्रीच्या शरीरावर कसलेही वाईट परिणाम होत नाहीत किंवा लैंगिक संबंधांमध्ये बाधा येत नाही. निरोध वापरणं सोपं आहे. सरकारी दवाखान्यांमध्ये निरोध मोफत मिळतो. स्त्रियांनी वापरण्याच्या गर्भनिरोधकांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि कॉपर टी किंवा तांबीसारख्या अडथळा पद्धती आहेत. गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये कृत्रिम संप्रेरकांचा वापर केलेला असतो ज्यामुळे अंडोत्सर्जन होत नाही आणि त्यामुळे अर्थातच गर्भधारणा होत नाही. मात्र या गोळ्या वापरताना स्त्रीच्या शरीरावर काही ना काही परिणाम होतात, त्याची योग्य माहिती डॉक्टरांकडून घेतल्यानंतरच गोळ्या वापरण्याचा निर्णय घ्यावा. सलग 6 महिन्यांहून अधिक काळ गोळ्या वापरू नयेत. दर सहा महिन्यांनी गोळ्या घेणं थांबवून मासिक पाळी वेळेवर येते आहे ना याची खात्री करावी. जास्तीत जास्त एक ते दोन वर्ष गोळ्यांचा वापर करता येईल.

समलिंगी: काही मुला मुलींना त्यांच्याच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं. मुलग्यांना फक्त मुलाग्यांबदल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं त्यांना ‘गे’ तर मुलींना मुलींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं त्यांना ‘लेस्बियन’ म्हणतात.

ट्रान्सजेंडर: ज्या व्यक्तीचं शारीरिक लिंग एक आहे व त्याचा लिंगभाव विरुद्ध लिंगाचा आहे अशांना ‘ ट्रान्सजेंडर असे म्हणतात. काही मुलग्यांना लहानाचं मोठं होत असताना सातत्यानं वाटतं की ते मुलगी आहेत. तसेच ट्रान्सजेंडर स्त्रिया या शरीरानं स्त्री असतात पण मानसिक दृष्ट्या त्यांचं भाव विश्व पुरुषांसारखं असतं.

उभयलिंगी: काही मुला/मुलींना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक व भावनिक आकर्षण वाटतं अशांना उभयलिंगी असं म्हणतात.

इंटरसेक्स:- ज्या व्यक्तींमध्ये जन्मतःच काही अंशी पुरुषाची व काही अंशी स्त्रीची बाह्य किंवा आंतरिक जननेंद्रिये असतात अशा व्यक्तींना इंटरसेक्स म्हणतात.

क्विअर: हा शब्द सर्वच लैंगिक अल्पसंख्यांकांसाठी एकत्रितपणे वापरला जातो. यामध्ये गे, लेस्बियन, ट्रान्सजेंडर, उभयलिंगी आणि इंटरसेक्स या सर्वांचाच समावेश होतो.

आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

letstalksexuality.com@gmail.com



    आमच्या वेबसाइटवर नव्याने प्रसिध्द होणार्‍या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा

    letstalksexuality.com@gmail.com



      पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

      वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी