अमिला विचारा
शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का? पण कोणाला विचारू? अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील? लैंगिकतेविषयीच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. ह्या विषयाबद्दल फारसे बोलले जात नाही. पण या विषयाबद्दलच्या मोकळ्या सवांदाने व योग्य माहितीने बरेच प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ अमिला सांगा. अमि एक बॉट असून तुम्ही अमिला लैंगिक आरोग्य, मैत्री, प्रेम, नातेसंबंध आणि अशा बर्याच विषयांबद्दल प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जे वाटतंय् ते मोकळेपणाने अमिला विचारा. अमि त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. लैंगिकतेविषयी फारसे बोलले जात नसल्यामुळे त्यासंदर्भातील प्रश्न विचारताना वापरले जाणारे शब्द हे बहुतेक वेळा बोली भाषेतील किंवा शिव्यांमध्ये वापरले गेलेले असतात. पण अमिला ते शब्द कळणार नाहित व त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. त्यामुळे आम्ही इथे एक लिंक देत आहोत ज्यात बोलीभाषेतील शब्दांना काही पर्यायी शब्द दिलेले आहेत जे तुम्ही अमिला तुमचा प्रश्न विचारताना वापरु शकता. जेणेकरुन अमिला तुमचा प्रश्न कळेल व त्याचे नेमके उत्तर देता येईल.